सोलापूर: भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लोकराजा छत्रपती शाहू महाराज मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, सोलापूर व (हबीबा बालकश्रम, सोरेगाव) येथे स्वराज्य संघटना व लोकराजा फाऊंडेशन तर्फ स्वराज्य संघटनेचे सोलापूरचे कार्यकर्ते माऊली पवार व आशुतोष तोंडसे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी टॅब व शिक्षण उपयोगी साहित्य तसेच ब्लँकेट्स व टाॅवेल यांचे वाटप करण्यात आले.
लोकराजा छत्रपती शाहू महाराज मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, सोरेगाव येथे विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासुनच स्पर्धा परीक्षांची ओळख निर्माण व्हावी यासाठी गेली 4 वर्षे येथे विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन केले जाते आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखालील सोलापूरातील संघटनेच्या प्रत्येक गावातील शाखेत असे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करणार असल्याची माहिती आशुतोष तोंडसे यांनी दिली. यावेळी समन्वयक :माऊली पवार, आशुतोष तोंडसे, सागर लोंढे, अहद शेख, सनी राठोड, अनील जगताप आदी उपस्थित होते..