सोलापूर: शहरामध्ये गेले काही दिवसांपासून मटका, जुगार, हातभट्टी दारु, शिंदी, गॅस वगैरे सारखे अवैध धंदे सुरु असलेबाबतची माहिती आहे. सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोनि. गुन्हेशाखा यांनी अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे दृष्टीने त्यांचे अधिनस्त असलेले पोलीस अंमलदार यांची खास पथके तयार करुन, वरील प्रकारचे अवैध धंदे करणारे चालक/मालक यांची माहिती काढावी व कोणीही अवैध धंदा करताना मिळून आल्यास त्यांचेवर कायदेशीर कारवाई करावी. तसेच आपले पोलीस ठाणे हद्दीत कोणताही अवैध धंदा चालणार नाही याची दक्षता घ्यावी. असे आदेश पोलीस उपायुक्त दीपाली धाटे यांनी दिले आहेत.