गंगा कदम ही सोलापूरची रहिवासी असुन तिच्या निवडीमूळे सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवला गेला आहे.
सोलापूर ; बेंगलोर येथे क्रिकेट असोशिएशन फॉर दि. ब्लाइंन्ड इन इडिया यांचेवतीने दिनांक 11/09/2025 रोजी घेणेत आलेल्या बैठकी मध्ये आगामी काळात होण-या पहिल्या वहिल्या अंध महिलांच्या टि-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड जाहीर करणेत आली. यात महाराष्ट्रातील खेळाडू गंगा संभाजी कदम हिची उपकर्णधार म्हणून करण्यात आली.


तर कर्नाटकच्या दिपीका टी.सी. या मुलीची कर्णधार म्हणून निवड करणेत आली आहे. गंगा कदम ही सोलापूरची रहिवासी असुन तिच्या निवडीमूळे सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवला गेला आहे. विश्वचषकातील सामने हे दिनांक 11/11/2025 ते 25/11/2025 दरम्यान दिल्ली, बेंगलोर व काठमांडू (नेपाळ) येथे होणार आहेत.
या विश्वचषक स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलीया, इंग्लंड, भारत, अमेरीका (युएसए), पाकिस्तान, श्रीलंका व नेपाळ या 7 देशांचे संघ सहभागी होणार आहेत. तिच्या या निवडीबद्दल सबंध महाराष्ट्रातून तिचे कौतूक होत आहे .सोलापूरातील उद्योजक राजेश दमाणी, भैरुरतन दमाणी अंध शाळेचे सचिव,संतोष भंडारी व मुख्याध्यापक प्रकाश दर्शणाळे यांनी अभिनंदन केले.
गंगा संभाजी कदम हिचा जन्म एका शेतमजुर कुटूंबात झाला. तिच्या घरी एकूण 8 बहिणी व एक भाऊ असा परिवार आहे. गंगा हिची घरची आर्थीक परिस्थिती अत्यंत हालाकीची असून सोलापूर येथील भैरुरतन दमाणी अंध शाळा सोलापूर या निवासी अंध शाळेत तिचे शालेय शिक्षण झाले. शालेय शिक्षण घेत असताना शाळेतील मुले क्रिकेट खेळत असलेली पाहुन तिलाही क्रिकेटची आवड निर्माण झाली.
शाळेतच तिने क्रिकेट शिकण्याचा हट्ट धरला होता. इयत्ता सातवीत शिकत असल्यापासुन तिला क्रिकेट खेळाचे धडे मिळाले. तिनेही क्रिकेट अगदी मन लावुन जिद्दीने शिकले आहे. सन 2017 मध्ये नाशिक येथे पार पडलेल्या पहिल्या अंध महिलांच्या क्रिकेट स्पधेमध्ये पश्चीम महाराष्ट्र संघातुन सोलापूरच्या एकूण 6 मुली सहभागी होत्या. त्यात गंगा हिचा समावेश होता. या स्पर्धेत पश्चीम महाराष्ट्र संघाच्या अर्ध्यापर्यंतही इतर संघ पोहचु शकले नाहीत. या स्पर्धेत पश्चीम महाराष्ट्र संघाने निर्विवाद आपले वर्चस्व सिध्द केले. या स्पर्धेची मालिकावीर म्हणुन गंगा कदम हिला सन्मानीत करण्यात आले होते.
तेव्हा पासुन अर्थात सन 2017 पासुन ते आजतागायत ती महाराष्ट्र राज्य अंध महिला क्रिकेट संघाची कर्णधार आहे. सन एप्रिल 2023 मध्ये भोपाळ येथे झालेल्या निवड शिबीरात गंगा हिने पहिल्या वहिल्या भारतीय अंध महिला क्रिकेट संघात आपले स्थान निश्चीत केले. भारतीय संघाची पहिली आंतरराष्ट्रीय मालीका ही नेपाळ या देशात झाली. त्यात भारतीय संघाकडुन गंगा कदम हिने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले होते. International Blind Sports Association यांचे वतीने बरमींगहॅम इग्लंड येथे आयोजीत अंध महिलांच्या जागतीक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारतीय अंध महिला क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलीयाचा पराभव करुन सुवर्ण पदक प्राप्त केले.
यात गंगा कदम हिने भेदक गोलंदाजी करताना 2 ओवर मध्ये 3 बळी घेतल्या तिच्या या उत्कृष्ट कामगीरीमुळे भारतीय संघास सुवर्ण पदक प्राप्त झाले होते.
जानेवारी 2025 मध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रिकेट सामन्यात तिने तेलंगणा विरुध्दच्या सामन्यात 77 चेंडुत 14 चौकारांच्या मदतीने 131 धावांची उत्कृष्ट खेळी करत महाराष्ट्र संघाला विजय मिळवून दिला. दिनांक 01/09/2025 ते 05/09/2025 दरम्यान बैंगलोर येथे झालेल्या विभागीय भारत स्पर्धेत साखळी सामन्यातील सर्व तिनही सामने जिंकत अंतिम सामन्यात दक्षिण भारत संघाचा 30 धावांनी पराभव करत मालिका जिंकली.
गंगा या मालिकेची मालिकावीर ठरली. गंगा ही पश्चीम भारस संघाची कर्णधार होती. घरची अतिशय हालाकीची परिस्थिती असताना 8 बहिणींमध्ये ही स्वत: अंध असताना परिस्थितीशी योग्य लढा देऊन गंगा कदम हिने हे यश प्राप्त केले. तिचे शालेय शिक्षण सोलापूरातील भैरुरतन दमाणी अंध शाळेत झाले व उच्चमाध्यमीक शिक्षण सोलापूर येथील हरीभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर येथे झाले. तर पदवी तिने मुंबई येथील किर्ती कॉलेजमध्ये कला विभागात प्राप्त केली.
सोलापूर येथील जामश्री इलिजीअयम क्रिकेट क्लब दमाणीनगर सोलापूर येथे ती सध्या प्रशिक्षक राजू शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचा सराव करत आहे.