No Result
View All Result
- मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांच्या लाचेसह बुकींची माहिती देण्याची ऑफर दिली होती. व्हिडीओ, ऑडिओ क्लिप्स आणि अन्य मेसेज पाठवून 10 कोटींची खंडणीची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणात डिझायनर अनिक्षा जयसिंघानीला अटक केल्यानंतर वाॅन्टेड बुकी अनिल जयसिंघानीचे नाव चर्चेत होते. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सायबर सेलने मोठी कारवाई करत सहा वर्षांपासून फरार असलेल्या बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक केली आहे. त्याचप्रमाणे बुकी अनिल जयसिंघानी याची मुलगी अनिक्षा हिला गेल्या शुक्रवारी उल्हासनगर येथून अटक करण्यात आली होती. त्यावेळी न्यायालयाने तिला 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली होती. त्याप्रमाणे आज तिची पोलीस कोठडी संपत असून तिला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
- वाॅन्टेड बुकी अनिल जयसिंघानी म्हणाला, आमच्यावर अन्याय झाला आहे. मी काही बोलल्यास मुलीला कोठडीत त्रास होईल. माझ्या मुलीवर केलेली केस पूर्णपणे बोगस आहे. अनिक्षाला पोलीस कोठडीच्या बाहेर येऊ द्या. मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. असा दावा त्यांनी केला आहे. सोबतच माझ्या आवाजावरून तुम्हाला कळत असेल. माझी प्रकृती बरी नाही. माझे वयही झाले आहे. मी कागदपत्रे पाठवेन. आमच्यासोबत अन्याय होत आहे. हे सर्व देव बघत आहे, असेही अनिल जयसिंघानी यांनी म्हटले होते.
- बुकी अनिल जयसिंघानी आणि फॅशन डिझायनर मुलगी अनिक्षा विरोधात गुन्हा दाखल केला गेला. नंतर मलबार हिल पोलिसांनी गुरुवारी अनिक्षाला उल्हासनगरातील राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली. तिला शुक्रवारी सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकिलांनी पोलिसांतर्फे केलेल्या युक्तीवादात अनिक्षाने अमृता फडणवीस यांच्याकडे तब्बल 10 कोटी रुपांच्या खंडणीची मागणी केल्यासह काही धक्कादायक खुलासे केले. अनिक्षा ही अन्य व्यक्तींच्या सांगण्यावरुन अमृता फडणवीस यांना भेटत होती. आपल्या वडिलांच्या विरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्यासाठी ती प्रयत्न करत होती. मात्र या सगळ्यात काही राजकीय व्यक्तींचाही सहभाग असण्याची दाट शक्यता असल्याचा दावा पोलिसांनी केला होता.
No Result
View All Result