सोलापूर – आषाढी यात्रा कालावधीत गतवर्षी पालखी मार्गावरील गावात “कचरा मुक्त गाव “ ही संकल्पना राबविणेत आली होती. हीच संकल्पना जिल्हयात राबविणेत येणार असून १५ मे २०२३ पासून सर्व ग्रामपंचायती व गावे कचरा मुक्त करणे साठी “कचरा मुक्त गाव अभियान” सुरू करणेत येणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे सिईओ व प्रशासक दिलीप स्वामी यांनी दिली.
सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सिईओ यांचे दालनात आज जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत व ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांचे बैठकीचे आयोजन करावेत आले होते. या प्रसंगी सिईओ दिलीप स्वामी यांनी कचरा मुक्त गावाची संकल्पना सांगितली. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, शिक्षणाधिकारी माध्यमिक जावेद शेख, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, अधिक्षक सचिन सोनकांबळे, प्शंरशिक्षण समन्कवयक शंकर बंडगर, सनियंत्रण सल्लगार यशवंत्ती धत्तरे, घनकचरा सल्लगार मुकूंद आकुडे, संवाद सल्लगार सचिन सोनवणे, सांडपाणी तज्ञ प्रशांत दबडे, क्षमता बांधणी तज्ञ महादेव शिंदे उपस्थित होते.
सिईओ दिलीप स्वामी म्हणाले, जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींनी दिनाक १५ मे २०२३ पासून आपली ग्रामपंचायती मध्ये ‘गाव कचरा मुक्त अभियान’ राबवयाचे आहे. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगून आषाढी यात्रा कालावधीत गतवर्षी पालखी मार्गावरील गावात “कचरा मुक्त गाव “ ही संकल्पना राबविणेत आली होती.
सिईओ स्वामी म्हणाले, तिर्थक्षेत्राचा जिल्हा म्हणून सोलापूर जिल्हा ओळखला जातो. सोलापूर जिल्हातून भीमा नदी वाहते. पंढरपूर येथे चंद्रभागा नदी म्हणून ओळखली जाते. ‘नमामि चंद्रभागा’ या नावाने जिल्ह्यात आपण अभियान राबविले आहे. जिल्ह्यात नदी काठा बरोबरच इतर गावात स्वच्छतेचे सातत्य टिकवून ठेवणे व गाव कचरा मुक्त करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. चंद्रभागा व इतर नद्याचे प्रदूषण रोखता येईल.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ कलम ४५ ग्रामसूची मध्ये ग्रामपंचायत पातळीवर वैद्यकीय व आरोग्य या सदराखाली गावस्तरावर स्वच्छता राखणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात घरगुती व सार्वजनिक पातळीवर घनकचऱ्याचे भौगोलीक परिस्थिती नुसार पारंपारीक व अनियोजित आधुनिक तंत्रज्ञाने पदधतीने व्यवस्थापन केले जाते. तसेच घरगुती पातळीवर उकीरडे व सार्वजनिक पातळीवर सार्वजनिक खत खड्डयात किंवा उघडयावरच प्रक्रीया न करता किंवा कच-याचे वर्गीकरण न करता कचरा टाकला जातो. गावस्तरावर कचरा व्यवस्थापन ही समस्या निर्माण होत आहे. व परिणामी वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेची गंभीर समस्या निर्माण होत आहे. ग्रामपंचायत स्तरावर रस्त्याच्या दुतर्फा, बस स्थानके, धार्मिक स्थळे. ऐतिहासिक स्थळे बाजार तळ दुकाने तसेच वर्दळीच्या ठिकाणी मोठयाप्रमाणात कचरा साठलेला असतो. अशा उघडयावर साठलेल्या कच-यामुळे नागरीकांच्या सार्वजनिक आरोग्यास धोका पोहोचतो. तसेच दृष्यात्मक स्वच्छता ही दिसुन येत नाही. असेही सिईओ स्वामी यांनी सांगितले.
केंद्रपुरस्कृत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा २ अंतर्गत वैयक्तिक / सार्वजनिक शौचालय बांधकाम, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन इत्यादी घटकां साठी ग्रामीण पातळीवर अंमलबजावणी सुरू आहे. त्यान्वये ग्रामपंचायत स्तरावर शाश्वत स्वच्छता ठेवण्याचे कामकाज सुरू आहे. केंद्र व राज्य स्तरावरून घनकचरा व्यवस्थापन करणे बाबत वेळोवेळी सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. सोलापूर जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीं व पर्यायाने जिल्हा कचरा मुक्त करणे करीता सर्वाचा सहभाग आवश्यक आहे.
तालुका स्तरावर करावयाची पूर्वतयारी – (दि. १० मे ते १४ मे २०२३)
१. तालुका स्तरावर गटविकास अधिकारी यांनी गाव / ग्रामपंचायत निहाय संपर्क / पालक अधिकारी यांची नेमणूक करावी.
२. तालुका स्तरावर बैठक घेऊन संबंधितांना कचरा मुक्त गाव करणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करावे.
३. नदी काठच्या ग्रामपंचायतीचा स्वतंत्र आराखडा तयार करणेत यावा.
४. odf मधील मोडेल झालेले ग्रामपंचायती चा पण यात समावेश करणेत यावा. त्या पद्धतीने नियोजन करून आराखडा जिल्हा कक्षास सदर करावा.
५. आषाढी यात्रचे पार्श्वभूमीवर पाळी मार्गावरील ग्राप मध्ये व्यापक प्रमाणावर जनजागृती करणेचे नियोजन करावे.
६. गाव पातळीवर लोगो सह बनर तयार करणेत यावा. गाव पातळीवर भिंतीवर स्लोगन टाकणेत यावेत. स्वच्छ सर्वेक्षण २०२३ चा लोगो काढण्यात यावा.
७. गाव पातळीवर होत असलेल्या कामाबद्दल पालक अधिकारी यांचा साप्ताहिक आढावा घेणेत यावा.
उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे म्हणाले , प्रत्यक्ष अभियान दि. . १५ मे ते १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत राबविणेत येणार आहे. जिल्हा परिषदेचे यशवंतराव चव्हाण सभागृहात १५ मे रोजी प्रारंभ करून अभियानास सुरुवात करणेत येणार आहे. तालुका व गाव पातळीवर या अभियानाचा शुभारंभ करणेत यावा. असेही सांगितले. गाव कचरा मुक्त करणेसाठी आवश्यक ती सर्व प्रचार प्रसिध्दी गावपातळीवर करणेत यावी. या बाबत ग्रामस्थामध्ये मध्ये जनजागृती करावी. सदर बाबत अमंलबजावणी न केलेस नियमानुसार दंड अथवा कारवाई करणेत येईल याची सुचना ग्रामस्थांना देण्यात यावी. नियोजन मासिक सभेत / ग्राम सभेत करणेचे आहे. यासाठी आवश्यक असणान्या निधीची तरतुद ग्रामपंचायतीने करावी.स्वच्छ भारत मिशन (SBM) / १५ वा वित्त आयोग/MGNREGA / राष्ट्रीय बायोगॅस व खतवस्थापन कार्यक्रम/ जिल्हा वार्षिक योजना / उदयोजकांचे सामाजिक उत्तरदायीत्व (CSR)/ नाविण्यपुर्ण योजना / लोकप्रतीनिधी यांचा विकास निधी/ ग्रामपंचायत निधी/ जि.प. निधी इत्यादी निधीमधून खर्च करावा.सदर निधी खर्च करताना त्या-त्या योजनेशी निगडीत शासन निर्णयात नमूद अटी, शर्ती चे व निकषांचे पालन करणे ग्रामपंचायतीवर बंधनकारक राहिल.
ग्रामपंचायत स्तरावर करावयाची कार्यवाही -……
सर्व ग्रामपंचायतींनी त्यांच्या स्तरावर जिथे दैनंदिन लोकवर्दळ जास्त आहे, तिथे व सार्वजनिक रस्ते / बाजार स्थळ / बस स्थानके / इतर सार्वजनिक ठिकाणी स्वच्छते करीता दैनंदीन झाडलोट व्यवस्था करावी. जास्त लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतींनी वॉर्डनिहाय नियोजन करावे.झाडलोट झाल्यानंतर जमा झालेला कचऱ्याचे ओला व सुका असे वेगवेगळे वर्गीकरण करणेत यावे. व असा कचरा कुंडीत संकलीत करणेत यावा . कचरा मुक्त गाव करणेसाठी कचरा संकलन हे घरगती व सार्वजनिक पातळीवर योग्य पदधतीने होणे आवश्यक आहे. असेही उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी सांगितले.
सार्वजनिक संस्था/ परिसर या ठिकाणीही या प्रमाणे संकलन होणे आवश्यक आहे. संकलित कचरा वाहतुकीसाठी आवश्यकते नुसार ग्रामपंचायतींनी वाहतुकीच्या व्यवस्थेचे नियोजन करणेचे आहे. असा वाहतूक केलेला कचरा हा कचरा प्रक्रिया प्रकल्पावर आणुन त्यावर प्रक्रिया करणेत यावी.ओल्या कच-यापासुन गांढूळ खत/ नॅडेप खत / कंम्पोस्ट खत प्रकल्प इ. आधुनिक प्रक्रीया प्रकल्प करावे. तसेच सुका कचरा प्लास्टिक/काच/कागद /लोखंड यांचे पुर्नप्रक्रियेसाठी पाठविण्याबाबत नियोजन करणेत यावे. ( पुर्नप्रक्रीये बाबत काम करणा-या संस्था / व्यक्तींची माहीती घेणेत यावी.)
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५९ कलम ४५ (ग्रामसूची ) अन्वये नेमून दिलेल्या कर्तव्यान्वये गावांमध्ये शाश्वत स्वच्छता रहावी या करीता तालुक्यातील जादा लोकसंख्या असणाऱ्या शहरालगत असणाऱ्या, लोकवर्दळ. तिर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ असणाऱ्या ग्रामपंचायतींनी गावस्तरावर कचरा संकलन, वर्गीकरण, वाहतूक व त्यावर प्रक्रिया करीता बाहय संस्था / कंपन्यांची विहीत पध्दतीने निवड करणेत यावीया करीता संबंधीत संस्थेस प्रकल्प देखभाल दुरुस्ती, मनुष्यबळ वेतन, इत्यादी करीता प्रति कुटुंब शुल्क आकारणी करणेसाठी आरोग्य कर अथवा इतर कर या सदरा खाली मासिक अथवा वार्षिक दर आपले ग्रामसभेत / मासिक सभेत ठरवून अंतिम करणेत यावेत. शासन स्तरावरून घनकचरा व्यवस्थापना बाबत वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करणेत यावे.
तरी सोलापूर जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींनी या महत्वपुर्ण समाजोपयोगी विशेष अभियानामध्ये लोक सहभाग वाढविण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करून प्रचार व प्रसार करून प्रबोधन करावे. आवश्यक ती सर्व कार्यवाही करून ग्रामपंचायती कचरा मुक्त होतील हे पहावे. असेही जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी सांगितले.