सोनाई फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज राठोड यांचा पुढाकार
” दक्षिणमध्ये युवराज राठोड यांची साखरपेरणी सुरू
सोलापूर: दक्षिण सोलापूर सोलापूर येथील सोनाई फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष युवराज राठोड यांच्यावतीने दक्षिण सोलापूर । तालुक्यातील मंद्रूप या गावात प्रथमच एका कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये साखरपेरणी सुरू केली आहे.
ईद-ए-मिलादुन्नबी उत्सव मध्यवर्ती समिती मंद्रूप व शान युवक संघटना, मंद्रूप यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम शुक्रवार, २० सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मंद्रूप येथील मौलाना आझाद चौकात होणार आहे. मुंबईचे सुप्रसिद्ध कव्वाल हाजी सुलतान नाझा हे आपली कव्वाली सादर करणार आहेत. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते व बसवेश्वर प्रतिष्ठानचे श्रीशैलमामा अध्यक्ष हत्तुरे, शिवसेना नेते अण्णाप्पा सत्तूबर, सरपंच अनिता कोरे, माजी सभापती दादा कोरे, उत्सव समिती अध्यक्ष यासीन मकानदार, माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी सोनाई फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज राठोड यांनी दक्षिण परिवर्तन विकास आघाडीची स्थापना केली आहे. त्या माध्यमातून त्यांची मोर्चेबांधणी सुरू असली तरी मागील काही दिवसांमध्ये स्वयंम शिक्षा फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांच्यासोबत अनेक सामाजिक कार्यक्रम घेतले परंतु आता वैद्य यांना सोडून राठोड हे प्रथमच मंद्रूप मध्ये कार्यक्रम घेत आहेत. एकूणच युवराज राठोड हे सर्व जाती धर्मांना एकत्रित करून सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचा प्रयत्न करताना आहेत.