येस न्युज मराठी नेटवर्क: इंडिका कार व बुलेट साठी जवळपास साडेपाच लाख रुपये रोख स्वरूपात घेऊन नवीन गाड्या एक महिन्याच्या आत देण्याचे आश्वासन फोल ठरल्यामुळे सदर बाजार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे . उमेश घाडगे यांनी ही तक्रार दिली असून मोहम्मद खाजा मुल्ला, अरीसा खाजा मुल्ला दोघे राहणार तेलंगी पाच्चा पेठ आणि आरिफ अहमद शेख राहणार मोदीखाना मशिदी शेजारी तसेच एल टी अँड फायनान्स कंपनीचे संबंधित कर्मचारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस सबइन्स्पेक्टर मतदार अधिक तपास करीत आहेत.