सोलापूर : दोनशे पन्नास दिवसात रक्कम दाम दुप्पट करून देतो आमची कंपनी संगणकीकृत आहे तीन हजार सहा हजार अठरा हजार 48 हजारच्या पटीत गुंतवणूक केल्यास आकर्षक गिफ्ट मिळेल त्याचप्रमाणे गुंतवणुकीवर एक टक्के व्याजदराने प्रत्येक महिन्याला आपल्या खात्यावर रक्कम जमा होईल अशी आमिषे दाखवून पुणे मुंबई व ठाणे येथील विनया धर्मेश गोसर अनिल वामन घेरे आणि सुभाष रामचंद्र मांडवकर यांनी सोलापूर शहरातील व जिल्ह्यातील पन्नास लोकांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे या प्रकरणात जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आत्माराम रामचरण ला जयस्वाल यांनी या संबंधात फिर्याद दिली आहे .ऑसम अवर अपॉर्च्युनिटी प्रायव्हेट लिमिटेड या नावाने हि कंपनी असल्याचे सांगण्यात येत होते.