सोलापूर : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव निमित्त सोलापूर शहरात सांगता मिरवणुक निघाली होती. सदर मिरवणुकीत सामिल होणा-या मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांना मिरवणुकी मध्ये त्यांच्या वादयाच्या आवाजाची तिव्रता नियमाप्रमाणे देवबाबत लेखी सुचना पोलीस आयुक्तांनी दिलेल्या होत्या. तरी पण पुढील मंडळांनी मिरवणुकी मध्ये ध्वनीक्षेपकाच्या आवाजाच्या मर्यादेचे वारंवार उल्लंघन केल्या प्रकरणी ४ मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
१) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक संस्था जय मल्हार चौक सिध्देश्वर हॉस्पीटल शेजारी सोलापूर अध्यक्ष – कृष्णा घडे
२) मुक्ता साळवी युवक क्रिडा व बहुउद्देशीय सामाजिक संस्था एस.टी. स्टॅन्ड शिवशक्ती हॉटेल जवळ सोलापूर अध्यक्ष राजेंद्र कांबळे
३) युवा साम्राज्य प्रतिष्ठान नरवीर तानाजी चौक,पुना नाका रोड सोलापूर अध्यक्ष सुरज देवकुळ
४) बिल्डर युवा प्रतिष्ठान बुधवार पेठ जय मल्हार चौक सोलापूर अध्यक्ष शेखर कांबळे असे एकुण ४ मंडळावर फौजदार चावडी पोलीस ठाणे सोलापूर शहर हद्दीत ध्वनी प्रदुषण कायद्याचे उल्लंघन करित असताना मिळुन आले आहे. म्हणून सदर मंडळावरती ध्वनी प्रदुषण कायद्याप्रमाणे योग्य ती कार्यवाही करिता मा. न्यायालयात खटले दाखल करित आहोत…