मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागलं.. त्यानंतर त्यांना माहीमच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मनोहर जोशी यांच्यावर आयसीयु मध्ये उपचार सुरू आहेत अशी माहिती मिळतेय.थोड्याच वेळात हिंदुजा रुग्णालयाकडून अधिकृत माहिती देखील दिली जाणार आहे. दरम्यान, जोशी यांची विचारपूस करण्यासाठी उद्धव आणि रश्मी ठाकरे हिंदुजा रुग्णालयात गेले होते.