सोलापूर – महिलांनो ताणतणावा पासून दूर रहा. आरोग्याची व आहाराची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीकडे लक्ष द्या. असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
अक्कलकोट येथे महिला व बालविकास विभाग व शिक्षण विभाग अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने संकल्पनेतून महिला सक्षमीकरण व गुणवत्ता वाढ बाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महिला व बालकल्याण विभागीय उपायुक्त संजय माने सर ,गटविकास अधिकारी सचिन खुडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, बालविकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा जाधव, शिक्षणाधिकारी माध्यमिक तृप्ती अंधारे, तालुका आरोग्य अधिकारी, डॉ करजखेडे, गट शिक्षणाधिकारी श्रीमती शेख शिक्षिका,अंगणवाडी पर्यवेक्षिका,सेविका , विस्तार अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
महिला सक्षमीकरणा साठी सोलापूर जिल्हा परिषदेने सर्व तालुक्यात कार्यशाळा घेणेत येत आहेत. असे सांगून सिईओ दिलीप स्वामी पुढे म्हणाले, महिला घर व कार्यालय या दोन्ही आघाडीवर काम करतात. अशा परिस्थितीत स्वत च्या आरोग्या कडे लक्ष देणे आवश्यक आहेत. आहाराची काळजी घेणे अधिक चांगले आहेत. महिलांसाठी हिरकणी कक्ष करणेत येत आहेत. जिल्हा परिषदेत विविध पदावर ४० टक्के पेक्षा अधिक महिला कार्यरत आहेत.
संस्कार क्षम विद्यार्थी तयार करा- सिईओ स्वामी
विविध उदाहरणे व आध्यात्मिक दाखवल्याचे संदर्भ देत त्यांनी उपस्थित महिलांच्या मनाचा ठाव घेत त्यांना संस्काराचे धडे दिले. लिहिलेले पुसतां येईल परंतू एखाद्या बाल मनावर पडलेला ओरखडा पुसतां येणार नाही. शिक्षण विभागात सुरू केलेली दशसुत्री उपक्रमांचे चांगले परिणाम समोर येत आहेत. या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा. जिल्हा परिषदेचे विविध वैविध्य पुर्ण उपक्रमाची राज्य स्तरावर दखल घेणेत येत आहे. रानभाज्या विषय हा छोटा वाटत असला तरी आरोग्याच्या दृष्टीने त्यांचे महत्त्व राज्य शासनाने जाणले. आज राज्यात सोलापूर च्या रानभाजी व दशसुत्री उपक्रमाची अमलबजावणी केली जात आहेत. सायकल बॅंके बरोबर मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणून गुणवत्ता पुर्ण शिक्षण देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
मुलाच्या गुणवत्ता वाढी कडे लक्ष द्या.
अक्कलकोट पंचायत समितीने महिला सक्षमीकरण व गुणवत्ता वाढी साठी चांगले प्रयत्न केले आहेत. स्वच्छ सुंदर शाळा प्रमाणे स्वच्छ व सुंदर अंगणवाडी असली पाहिजे. स्वच्छतेची काळजी घ्या. मुलांच्या आहाराकडे लक्ष देणे बरोबर गुणवत्ता वाढी कडे लक्ष द्या. मुलांना खेळणी व शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून शिकवा. जेणेकरून त्यांची गुणवत्ता वाढीस मदत होईल असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. प्रास्तविक बालविकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा जाधव यांनी केले. तर महिला व बाल कल्याण चे उपायुक्त संजय माने, शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरात राबवण्यात येत असलेल्या “एक कुटुंब एक वृक्ष” मोहिमेचा शुभारंभ अक्कलकोट तालुक्यातील ग्रामपंचायत समर्थ नगर येथील अंगणवाडी मधून वृक्षारोपण मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे हस्ते करणेत आले. सहशिक्षिका करुणा गुरव यांनी आभार मानले.