कोल्हापूर (सुधीर गोखले)- पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले भुदरगड तालुक्यातील श्री क्षेत्र अदमापूर आज अमावस्या निमित्त यात्रेमध्ये बाळूमामा भक्तांचा मेळा याठिकाणी भरला आहे जवळ जवळ २ ते ३ किमी पर्यंत भाविक रांगेत उभे राहून बाळूमामांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी उभे आहेत पण वाहतुकीच्या होणाऱ्या कोंडीबाबत मंदिर व्यवस्थापन आणि पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष केल्याच्या भावना भाविकांनी बोलून दाखवल्या तर भाविकांच्या या महासागरामुळे कुर ते मुदळतिट्टा आणि मुरगूड ते मुदळतिट्टा वाहतूक ठप्प झाली.
श्री क्षेत्र अदमापूर येथे प्रत्येक सोमवारी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असते अमावास्ये दिवशी यात्रा भरते हि गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचलली नसल्याने भाविकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या ठिकाणी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कोट्यवधी चा उड्डाणपूल हि बांधण्यात आला आहे मात्र या पुलाच्या दोन्ही बाजूला वाहने उभी असलेल्या कारणाने वाहतुकीला अडथळा होत आहे तर एखादा अपघात झाला तर प्रशासनाला जाग येणार आहे का ? असा संतप्त सवाल नागरिक आणि भाविक विचारत आहेत.
भाविकांनीही शिस्तीचे पालन करणे गरजेचे
मंदिराशेजारी असलेल्या वाहनतळाचा वापर भाविकांकडून होणे आवश्यक आहे मात्र भाविकांकडून सुद्धा शिस्तीचे पालन होणे गरजेचे आहे. पण आहे तो वाहनतळ देखील वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशस्त ठिकाणी होणे आवश्यक आहे.