सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्हा यांच्या वतीने मराठा आरक्षणसंदर्भात मुंबई आमरन उपोषणच्या नियोजनासाठी व मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना साथ देण्यासाठी संपूर्ण सोलापूर जिल्हा आणि शहर यांची नियोजनाची बैठक छ. शिवाजी प्रशाल येथे पार पडली.
याप्रसंगी जिल्हा आणि शहर यातील प्रमुख मराठा समन्वयक हजर होते. बैठकीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.यामध्ये माढा, मोहोळ, करमाळा, माळशिरस, पंढरपूर ,बार्शी, सांगोला, अक्कलकोट, मंगळवेढा, तसेच दक्षिण आणि उत्तर तालुक्याचे प्रमुख समन्वयक उपस्थित होते.
यामध्ये प्रा. रामदास झोळ , करमाळा, रणजित पाटील माळशिरस, सौदागर जाधव माढा, संतोष गायकवाड मोहोळ, प्रकाश मुळीक मंगळवेढा, सचिन काळे ,दीपक वडदेकर ,राम गायकवाड पंढरपूर, यांनी नियोजन बद्दल आपली मते मांडली.या प्रसंगी प्रत्येक तालुका आणि शहर, तसेच संपूर्ण जिल्ह्यातून ५ लाख लोक मुंबईच्या दिशेने चालत जाण्यासाठी सहभागी होतील. अशी ग्वाही दिली.या प्रसंगी प्रा. देशमुख, माऊली पवार , राजनभाऊ जाधव, पुरुषोत्तम बरडे, महेश पवार निर्मला शेळवणे यांची भाषणे झाली.
याप्रसंगी नाना काळे, श्रीकांत डांगे, महादेव गवळी, श्याम गांगर्डे, हेमंत पिंगळे, लहू गायकवाड, चंद्रकांत पवार,सोमनाथ राऊत , ज्ञानेश्वर अप्पा सपाटे , प्रशांत पाटील, जी. के.देशमुख सर, सदाशिव पवार, महाडिक सर, हनमंतू पवार, यादव सर, विजय पोखरकर, राम काका जाधव, सचिन गुंड, मनीषा नलावडे, मुळे ताई, शोभना सागर ताई इत्यादी प्रमुख मराठा बांधव उपस्थित होते.
कोणत्याही परिस्थितीत ५लाखापेक्षा जास्त मराठा मुम्बई आंदोलनासाठी घेवून जाण्याचा संकल्प केला.
यासाठी तालुका दौरे करण्याचे निश्चित केले. संपूर्ण सोलापूर जिल्हा ढवळून काढण्याचं या बैठकीत ठरले….. प्रास्ताविक प्रा.गणेश देशमुख यांनी केले व आभार सीए विनोद भोसले यांनी मांडले.