८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
सोलापूर : शहर हद्दीतील मागील काही दिवसांपासून अज्ञात चोरट्यांकडून घरफोडीचे सत्र झाले होते. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे निखिल पवार यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार रेकॉर्डवरील गुन्हेगार शशिकांत रक्षे हा घरफोडीतील सोन्याचे दागिने घेऊन थांबल्याचे खात्रीशीर माहिती मिळाली. गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता वरील आरोपीने पाच ठीकानी चोरी केल्याची कबूली दिली. त्याच्याकडून सोन्याचे २१.५ ग्रॅम वजनाचे दागिने व चांदीचे ४०० ग्रॅम वजनाचे दागिने व रोख रक्कम 61 हजार असे एकूण ८६ हजार रुपये इतका मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला.