येस न्युज नेटवर्क : आस्ट्रेलिया पुढच्या महिन्यापासून रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकाला अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. दरम्यान, आयसीसीनं मोठ्या स्पर्धेसाठी बक्षीस रक्कमेची यादी जाहीर केलीय. या स्पर्धेत एकूण 5.6 दशलक्ष बक्षीस रक्कम ठेवण्यात आली आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम सुमारे 45.66 कोटी इतकी आहे. या स्पर्धेतील विजेता संघाला 1.6 मिलियन म्हणजेच जवळपास 13 कोटी रुपये मिळतील. तर, रनरअप संघाला सुमारे 6.5 कोटी रुपयांचं बक्षीत दिलं जाईल.
दरम्यान, येत्या 16 ऑक्टोबरपासून खेळल्या जाणाऱ्या आयसीसी टी-20 विश्वचषकात एकूण 16 संघ दम दाखवतील. जवळपास एक महिना ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत होणाऱ्या संघासाठी 4 लाख यूएस डॉलर दिले जातील. तर, सुपर 12 मधून बाहेर पडलेल्या 8 संघांमधील प्रत्येक संघाला 7 हजार अमेरिकन डॉलर्स मिळणार आहेत.