कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू नाही
सोलापूर : शहराचा covid-19 चा ५ जून रोजीचा अहवाल प्राप्त झाला आहे . शुक्रवारी रात्री १३ वाजता संपलेल्या २४ तासांत शहरामध्ये १५ जणांना नव्याने कोरोनाची लागण झाली आहे. या कालावधीत ५३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत . दिलासादायक बाब म्हणजे सोलापूर शहरात २४ तासात एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या सध्या सोलापूर शहरात ३०० आहे.

