सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची सत्र परीक्षा सध्या सुरु आहे. अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाची महाविद्यालये उशिराने सुरु झाल्याने त्या विद्यार्थ्यांची परीक्षा आता ६ मार्चपासून सुरु करण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे. तर अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाची परीक्षा फेब्रुवारी अखेरीस सुरु केली जाणार आहे.
विद्यापीठ व उच्च महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी २ फेब्रुवारीपासून कामबंद परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे विद्यापीठाला १०९ महाविद्यालयांमधील तब्बल ७० हजार विद्यार्थ्यांची परीक्षा अचानकपणे दोन दिवस रद्द करावी लागली होती.त्यानंतर कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, प्र-कुलगुरू डॉ. राजेश गादेवार यांनी सर्व संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक घेऊन परीक्षेची जबाबदारी त्यांच्यावरच सोपवली. जेणेकरून विद्यार्थ्यांना पुढील काळात कोणतीही अडचण येवू नयेत, हा त्यामागील हेतू होता. त्यासाठी विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना परीक्षा केंद्रांवर पाठविण्यात आले आणि महाविद्यालयांनाही कंत्राटी कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी, अशी परवानगी देण्यात आली.परंतु, त्या काळातील रद्द झालेले पेपर आता १७ ते २२ फेब्रुवारी या काळात घेतले जाणार आहेत. त्यात पारंपारिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश आहे. दरम्यान, विद्यापीठाने यंदापासून ऑनस्क्रिन उत्तरपत्रिका तपासणी सुरु केली आहे. त्यामुळे सुरवातीला झालेल्या पेपरचे निकाल तयार झाले आहेत. उर्वरित परीक्षा पार पडल्यानंतर एप्रिलपर्यंत सर्वांचे निकाल जाहीर होतील आणि पुढील शैक्षणिक वर्ष वेळेत सुरु करण्याचे नियोजन विद्यापीठाने आतापासूनच सुरु केले आहे.
रद्द झालेले पेपर व अभियांत्रिकी परीक्षांचे नियोजन अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाचे पेपर १७ फेब्रुवारीपासून सुरु होतील१७ फेब्रुवारीपासून ‘बी-टेक’ चौथ्या वर्षाचे व बीई-आर्किटेक्चरच्या ४,६ व ८ व्या सेमिस्टरची परीक्षा‘बी-टेक’च्या तृतीय वर्षाचे पेपर २४ फेब्रुवारीपासून; फार्मसीचे पाच व आठवे सेमिस्टर २१ फेब्रुवारीलाअभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाचे पेपर मार्चच्या पहिल्या आठवड्यात तर द्वितीय वर्षाची परीक्षा फेब्रुवारीअखेरीसफार्मसीची परीक्षा २० ते २२ फेब्रुवारीला; ६ व ७ सेमिस्टर विषयनिहाय २० व २२ फेब्रुवारीला
आंदोलनामुळे रद्द झालेले पेपर १७ फेब्रुवारीपासूनपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कॅम्पस व संलग्नित महाविद्यालयांमधील जवळपास ७० हजार विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत सुरु आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे रद्द झालेले पेपर १७ फेब्रुवारीपासून घेतले जातील. अभियांत्रिकीची परीक्षा मार्चपासून सुरु होईल.