सोलापूर शहराचा पर्यावरण सद्यस्थितीचा अहवाल तयार

0
37

सोलापूर : महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील 67 अ नुसार सर्व महानगरपालिकानी आपल्या शहराचा पर्यावरण सद्यस्थिती अहवाल प्रत्येक वर्षी 31 जुलै पर्यंत महाराष्ट्र प्रदूषण मंडळांचे DPSIR या मार्गदर्शक तत्वांच्या अनुषंगाने तयार करून सर्वसाधारण सभेकडे पाठविणे आवश्यक असुन आज सोलापूर महानगरपालिकेने सन 2021-22 करिताचा ESR अहवाल पर्यावरण विभाग, पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांचे माध्यमातून तयार केला असुन सदर अहवाल आयुक्त पी शिवशंकर व कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांचे हस्ते करण्यात आले.

सदरवेळी अतिरिक्त आयुक्त श्री विजय खोराटे, उपायुक्त श्री मच्छिंद्र घोलप, अरविंद जोशी, स्वप्निल सोलनकर, गणेश बिराजदार, विनायक धुळप, पंकज सुतकर आदी मान्यवर उपस्थित होते. या अहवाला मध्ये पंचमहाभूतांची (वायु, जल, भुमी, अग्नी व आकाश) शहरातील सध्याची स्थिती दर्शविली असुन वातावरण बदलामुळे होणारे परिणामांचा सहभाग करणेत आला आहे.आजला सदर अहवाल हा शहरवाढीला चालना देणारा तसेच शहरातील नागरिकांना आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाची सद्यस्थिती दर्शवणारा व विध्यार्थ्यांना संशोधनसाठी महत्वाची माहिती उपलब्ध करून देणारा ठरणार आहे. तसेच सदर अहवालामध्ये महानगरपालिका स्तरावर पर्यावरणाच्या दृष्टीने घेण्यात येत असलेल्या उपक्रमांची थोडक्यात माहिती देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच सोलापूर महानगरपालिकेस महाराष्ट्र शासनाचे माझी वसुंधरा अभियान सन 2021-22 अंतर्गत सोलापूर महानगरपालिकाने प्रथम वर्षी सहभाग घेऊन उत्कृष्ट काम करून एकूण 43 अमृत शहरांमधून पुणे विभागात प्रथम क्रमांक शहरास प्राप्त झालेबाबत मा कुलगुरू यांनी अभिनंदन केले.