येस न्युज मराठी नेटवर्क : मुंबईसह महाराष्ट्रात हिंदुत्व, भोंगा आणि हनुमान चालीसा यावरून राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच पर्यावरण हा मुख्य प्रश्न म्हणून राजकारण्यांनी त्याचा विचार करावा, असे आवाहन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
मुंबईसह महाराष्ट्रात हिंदुत्व, भोंगा आणि हनुमान चालीसा यावरून राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच पर्यावरण हा मुख्य प्रश्न म्हणून राजकारण्यांनी त्याचा विचार करावा, असे आवाहन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. तसेच, भोंग्याबाबत सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचे पालन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
राजकारण्यांनी विचार करावा – हवामानातील बदल आणि भौगोलिक व इतर कारणांनी जगभरातील शहरांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते आहे. मुंबई महानगराला देखील पावसाळ्यात अतिवृष्टीप्रसंगी पूरस्थितीचा सामना करावा लागतो. या अनुषंगाने मुंबईतील पूर जोखीम, वेगवेगळ्या घटकांवर त्याचे होणारे परिणाम व संभाव्य उपाययोजना या विषयी विचारविनिमय आणि मार्गदर्शन करण्यासाठी (आज २८ एप्रिल आणि उद्या २९ एप्रिल) दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन सह्याद्री राज्य अतिथीगृह (वाळकेश्वर) येथे करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.