सोलापूर : रविवारी ११ ऑगस्ट रोजी गोल तालीम संघाचे संस्थापक कट्टर हिंदुत्ववादी सामाजिक कार्यकर्ते योगेश पिरचंद सलगर,मंदार चितापुरे नागराज गुडदौर,अंबादास दलशिंगे नाना देवकर यांनी आपल्या संस्थेचे प्रमुख पदाधिकारी व मित्रमंडळी समवेत शिवसेना शिंदे गटामध्ये जिल्हाप्रमुख अमोल शिंदे व संजय सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शिंदे गट नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख व सोलापूर मध्य विधानसभेचे प्रभारी विजय शेठ चौगुले व शिवसेनेचे संपर्कप्रमुख शिवाजी सावंत,महाराष्ट्राच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये छत्रपती रंग भवन येथील मेळाव्या प्रसंगी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,यावेळी त्या सर्वांना पुढच्या राजकीय वाटचालीसाठी चाटी गल्ली कापड व्यापारी नंदकुमार झंवर,दीपक मुत्ता,महादेव स्वामी,सतीश आनंदकर सुरज भोसले,नरेश गडगी यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात आले.