सोलापूर दि.30(जिमाका) :- शासनाच्या नियोजन विभागाकडील शासन निर्णयातील तरतुदीनुसार पात्र हजेरी सहायक यांना निवृत्तीवेतनार्ह लाभ देण्याचे आदेश दिले आहेत , जिल्ह्यातील सदर शासन निर्णयानुसार सेवानिवृत्तीविषयक लाभ देणेसाठी आढळ होत नसलेले 62 हजेरी सहायक यांची यादी solapur.nic.in या संकेत स्थळावर प्रसिध्द केलेली आहे.
तरी या यादीमधील हजेरी सहायक यांनी शासन निर्णय , दि. 23 मे 2023 मधील निर्णयानुसार निवृत्तीवेतनार्ह लाभ घेण्यासाठी त्यांच्या सेवानिवृत्त कार्यालयाशी किंवा जिल्हाधिकारी कार्यालय रोजगार हमी योजना शाखेशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी रोहयो श्रीमती अंजली मरोड यांनी केले आहे.