येस न्युज मराठी नेटवर्क : माघवारी मध्ये येणाऱ्या सर्व भाविकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी.लस घेणे खूप आवश्यक आहे.वारी परंपरा टिकावी यासाठी आरोग्य विभागाने दिलेल्या सूचना पालन करून वारी करावी लागेल. यासाठी अखिल भाविक वारकरी मंडळाचे वतीने सोलापूर शहारामध्ये चार विभागात बैठक घेऊन जनजागृती करणेत आली. प्रत्येक दिंडी प्रमुखांना सांगण्यात आले की, आपापल्या दिंडीतील सर्व भाविकांनी दोन लस घेऊन दिंडी मध्ये सहभागी व्हावे. तसे प्रमाण पत्र ही सोबत घ्यावे. कीर्तनकरानी सुद्धा कीर्तन -प्रवचनातून कोरोना प्रतिबंधक लस प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. अशी जागृती करावी. प्रत्येक दिंडी प्रमुखांनी आपल्या दिंडीतील वहानावर - मंडपावर बॅनर लावावेत.मास्क घालणे गरजेचे आहे.कोरोना संबंधी जास्तीत जास्त जागृती करावी. असे प्रबोधन भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज यांनी केले.पंढरपूरमध्ये 65 एकर सुद्धा लस संदर्भात जागृती करणार आहोत.प्रशासनाने सुद्धा पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांना लस देणेसाठी विविध ठिकाणी नियोजन करावे. असे निवेदन ही अखिल भाविक वारकरी मंडळाचे वतीने देणेत आले आहे. या प्रसंगी बळीराम जांभळे, जोतिराम चांगभले,बंडोपंत कुलकर्णी, कुमार गायकवाड, अभिमन्यू डोंगरे महाराज, नामदेव पुलगम, पांडुरंग जगताप,सचिन गायकवाड,इ. पदाधिकारी उपस्थित होते.