पीएमसी संस्थेस कारणे दाखवा नोटीस
सोलापूर – ओडिएफ प्लस गाव करणे साठी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन ती कामे वेळेत पुर्ण करा. जलजीवन मिशन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा. जलजीवन मिशन च्या कामात दिरंगाई केलेस काळ्या यादीत टाकू अशा इशारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी दिला. तांत्रिक सहाय्य करणारी पीएमसी संस्थेस कामात दिरंगाई केलेबद्दल कारणे दाखवा नोटिस देऊन मानधन रोखणेचे आदेश दिले आहेत.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आत जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत आढावा बैठकीचे आयोजन करणेत आले होते. या बैठकीस जल जीवन मिशन ते प्रकल्प संचालक अमोल जाधव, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, भूजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भुवैज्ञानिक डाॅ. संजय कुलकर्णी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांचे सह गटविकास अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता, विस्तार अधिकारी पंचायत व आरोग्य, बीआरसी व सीआरसी, आयएसए, पीएमसी, टीयूव्ही या सल्लागार संस्थेचे समन्वयक व कर्मचारी उपस्थित होते.
जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल से जल या बाबी महत्वाच्या आहेत.
जेजेएम मोबाईल अॅप मधून हर गर नल से जल ची आॅनलाईन कामे पुर्ण करावीत. ३३० गावात ग्रामसभा घेऊन पुर्ण करावेत. या साठी ठराव घ्या. व्हीडीओ घेऊन अपलोड करावे लागणार आहे. ग्रामसेवक यांचेशी संवाद साधा. काम पुर्णत्वाचा दाखला घ्या. अशा सुचना सिईओ मनिषा आव्हाळे यांनी दिल्या.
हरघर जल साठी विशेष ग्रामसभा घ्या
जिल्ह्सात ३३० ग्रामपंचायती मध्ये १०० टक्के नळ कनेक्शन देणेत आले आहे. ज्या गावात अद्याप नळ कनेक्शन बाकी आहे अशी गावे पुर्ण करा. विशेष ग्रामसभा घेऊन दोन मिनिटाचा व्हीडीओ व ग्रामसभा ठराव घेऊन आॅनलाईन नोंदणी करा. पाणी गुणवत्ते मध्ये काम कमी असलेले अक्कलकोट, मंगळवेढा तालुक्यांना नोटिसा देणेचे सुचना सिईओ मनिषा आव्हाळे यांनी दिल्या.
तर काळ्या यादीत टाकणार
कामे वेळेत पुर्ण करा. जे ठेकेदार काम वेळेत पुर्ण करणार नाहीत त्यांना काळ्या यादीत टाकणार आहेत. कुठे अडचणी येतात ते मांडा. किती दिवसात कामे पुर्ण करणार याचा लेखी अहवाल द्या. थर्ड पार्टी निरीक्षण साठी जास्त मनुष्यबळ लावा. वेळेत काम न करणारे ठेकेदारांमार्फत काळ्या यादीत टाकणेचे सुचना शासनाने दिले आहेत. शासनाने दिलेले सुचनांचे आम्ही पालन करीत आहोत. ज्या ठेकेदारांना काम करताना अडचणी येतील त्यांना कामात मदत करू अशी ग्वाही दिली. २० डिसेंबर पर्संत जलजीवन मिशन च्या सर्व योजना पुर्ण करावयाचे आहेत ते लक्षात ठेवा. ठेकेदारांच्या अडचणी जाणून घेऊन वाळु उपलब्धता, जीएसटी मधील फरक व पाईप च्या वाढलेल्या किमती मधील तफावती बाबत सकारात्मक विचार करू अशी ग्वाही सिईओ आव्हाळे यांनी दिली.
येत्या १५ आॅगष्ट पर्यंत ग्रामपंचायती ओडिएफ प्लस करा
येत्या १५ आॅगष्ट पर्यंत जास्तीत जास्त ग्रामपंचायत ओडिएफ प्लस करा. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन ची कामे वेळेत करा. ट्रायसायकल व डस्टबीन व शौषखड्डे ची कामे वेळेत पुर्ण करा. केंद्र शासानाचे संकेतस्थळावर माहिती अपडेट करा. सर्व संस्थांचे प्रशिक्षण घ्या. आधी कामांची योग्य माहिती करून घ्या.
स्वच्छ भारत मिशन व जलजीवन ला गती येई पर्संत दर शनिवारी बैठक
स्वच्छ भारत मिशन व जलजीवन मिशनच्या कामांनी गती येई पर्संत दर शनिवारी मिटींग घेणार असल्याचे सांगून जलजीवन मिशन मध्ये हालगर्जी पणा खपवून घेणार नाही. केंद्र शासनाचा प्राध्यान्याची योजना आहे.
उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी जलजीवन मिशन ची विस्तृत माहिती दिली. योजनेत गती देणे साठी सरिवांचे सहकार्य अपेक्षित आहे. प्रत्येक घटकात कारवाई करणे पेक्षा योजना व अडचणी समजून घेणे साठी ठेकेदारांसह बैठक सिईओ यांनी घेणेचे सुचना दिले आहेत. यामागचा उद्देश्य वेळेत योजना पुर्ण होणे हा आहे. असेही जाधव यांनी सांगितले. कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांनी नळकनेक्शन वेळेत पुर्ण करा. हर घर जल से नल अंतर्गत गावांची आॅनलाईन नोंदी करणेचे सांगून योजनेतील जागा नसलेले ग्रामपंचायती तसेच जे ठेकेदार काम करणार नाही त्यांचेवर कारवाई करणेचा स्पष्ट इशारा दिला.