सोलापूर दि. १७ : प्रिसिजन उद्योगसमूहाच्या वतीने पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्याची मदत करण्यात आली आहे. ४१६ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला आहे. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयात प्रिसिजन कॅमशाफ्ट्सचे अध्यक्ष मा. यतिन शहा आणि प्रिसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांच्या हस्ते या शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना प्रिसिजन समूहाने पुढील शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या सहकार्याबद्दल पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी प्रिसिजन समूहाचे आभार मानले. यावेळी प्रिसिजनच्या जनसंपर्क विभागाचे आदित्य गाडगीळ तसेच पत्रकार संघाचे सदस्य व त्यांचे पाल्य उपस्थित होते.