Yes News मराठी मध्ये इको फ्रेंडली गणपती…!

0
25

येस न्यूज मराठी मध्ये इको फ्रेंडली गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. सोलापूरचे आर्टिस्ट विकास गोसावी यांनी ही पर्यावरण पूरक अशी मातीची सुंदर मूर्ती बनवली आहे. फडकले सभागृहातून गणपती बाप्पा मोरया च्या गजरात ही मूर्ती येस न्यूज मराठीच्या कार्यालयात आणण्यात आली. संपादक शिवाजी सुरवसे आणि गीतांजली सुरवसे यांच्या हस्ते पूजा करून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. येस न्यूज मराठीच्या निवेदिका माधवी पाटील यांनी गणेशोत्सव निमित्त आकर्षक अशी किल्ल्याची प्रतिकृती बनवली. पहिल्यापासूनच येस न्यूज मराठीच्या वतीने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा केला जातो.सर्व सदस्यांच्या उपस्थितीमध्ये गणरायाची आरती करण्यात आली.

यावेळी शांता सुरवसे, विजय आवटे, शिवानंद जाधव, माधवी पाटील, राजेश भोई ,राणी इंगळे ,शुभम इंगळे, हर्षाली सुरवसे, सिद्धी सुरवसे, प्रगती इंगळे आदी उपस्थित होते.