सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ भूशास्त्र संकुल आणि द भै फ दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय दोन दिवसीय ड्रोन-आधारित प्रत्यक्ष प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ लक्ष्मीकांत दामा यांनी पर्यंत काही ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर आधुनिक युगात अत्यंत महत्त्वाचा झालेला आहे आपण विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाकडे वळणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. ड्रोन विविध क्षेत्रांमध्ये आपले पदार्पण करत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत असे मत व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यशाळेचे संयोजक डॉ. वीरभद्र दंडे, विभागप्रमुख, भूगोल विभाग, डी.बी.एफ. दयानंद महाविद्यालय, सोलापूर आणि डॉ. विनायक पी. धुळप, संचालक, भूशास्त्र संकुल, कार्यशाळेचे समन्वयक अतिश धेंडे, डॉ. महादेव लवटे, उपस्थित होते.

ड्रोन आधारित भू-अवकाशीय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाश्वत विकास, संशोधनवृद्धी आणि कौशल्याधारित शिक्षणाला चालना देणारा हा उपक्रम ठरणार असल्याचे डॉ. विनायक धुळप यांनी सांगितले. आपल्याला बरं नसेल तर कार्यक्रमाचे आभार डॉ. व्ही सी दंडे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. चेतन हुलसुरे, डॉ. धानेश लिगाडे, प्रा. ज्योती लातुरे, प्रा. पूजा होळीकट्टी, डॉ. अनिल येडगे, डॉ. मंगेश वेदपाठक, प्रा. अक्षय चव्हाण, प्रा. प्रशांत उन्हाळे, प्रा. सिद्धाराम चौगुले, प्रा. मृण्मयी गवळी, प्रा. अतिश धेंडे, प्रा. महेश कंदी, आदी व साधारण 250 विद्यार्थी उपस्थित होते.

