सोलापूर : नगरसेविकाराजश्री चव्हाण यांचे अथक प्रयत्नला यश. प्रभाग क्रमांक 26 मधील अक्षय सोसायटी जवळील शिवशक्ती चौकात नेहमी वर्दळ असते या चौकातून ओम गजानन चौक,बॉम्बे पार्क,भाग्यलक्ष्मी पार्क,अक्षय सोसायटी,गुरुदेव दत्त नगर,आय एम एस कॉलेज, या भागातील नागरिक ह्या रस्त्यावरून सारखी वर्दळ असते.

गेल्या तीन दिवसापासून सदर चौकात ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळे रोडवर गटारीचे पाणी येऊन ते अक्षय सोसायटीच्या मैदानात गेल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. नागरिकांनी वारंवार संबंधीत विभागाकडे तक्रार करूनही त्याची कोणी दखल घेत नव्हते.
त्यावेळी सदर परिसरातील महिला वर्ग ही बाब राजश्री चव्हाण यांचे निदर्शनास आणून दिली व आमची कोणीच दखल घेत नाही अशा व्यथा मांडल्या असता .राजश्री चव्हाण यांनी लगेच सोलापूर महानगरपालिका आयुक्त ओंबासे साहेब यांना सदर समस्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तातडीने अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे साहेब यांना सदर समस्या आजचे आज पूर्ण करण्यासाठी आदेश दिल्याने युद्ध पातळीवर तेथील काम एका दिवसात पूर्ण केल्याने तेथील रहिवासी यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
व आपले मनोगत व्यक्त केली की.. नगरसेवक असावा तर नगरसेविका राजश्री चव्हाण यांचा सारखा असावा कारण त्यांना फोन किंवा समक्ष भेटून समस्या सांगितल्या तर त्या जातीने पाठपुरावा करतात व नागरिकांच्या समस्या सोडवतात. विशेष म्हणजे त्यांचा नगरसेवकांचा कार्यकाल संपलेला असताना सुद्धा त्या नागरिकासाठी जोमाने कामे करत आहेत हे विशेष.वास्तविक पाहता इतर नगरसेवक कुठे आहे हेच दिसत नाही परंतु नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांचे बाबतीत सांगायचे झाले तर ते वेगळेच आहे विशेष म्हणजे त्यांना फोन केला असता जातीने उचलतात व समस्या ऐकून घेऊन त्यांचं निराकरण करीत असतात एखाद्या वेळेस जर चुकून फोन उचलला गेला नाही किंवा मिस कॉल पडला तर त्या आवर्जून फोन करतात व समस्या ऐकून घेऊन संबंधित अधिकारी यांना समक्ष बोलवून घेऊन त्यांचे समस्याचे निराकरण करीत असतात हे विशेष अशा जनतेसाठी तळमळ असणाऱ्या नगरसेविका आम्हाला लाभल्या हे आमचे भाग्य समजतो असे मनोगत व्यक्त केले व तातडीने दुर्गंधीच्या समस्या दूर केल्याने त्यांचे मनापासून आभार मानले आहे.