मुंबई सायन येथील आयुर्वेदिक महाविद्यालय यांच्यातर्फे दरवर्षी विविध क्षेत्रातील डॉक्टरांसाठी गायन स्पर्धा घेण्यात येत असते त्याचप्रमाणे यावर्षीही या गायन स्पर्धेचा आयोजन सायन येथे आयुर्वेदिक महाविद्यालयात करण्यात आले होते, यामध्ये संगीतकार आर.डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांची निवड करण्यात आली होती. या गायन स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून सर्व प्रकारच्या पॅथीचे डॉक्टर स्पर्धक आलेले होते. सर्वांनीच एकापेक्षा एक गाणी सादर करून आयोजक तसेच परीक्षकांचे मने जिंकली. यामध्ये मुंबईतील प्रसिद्ध वादक मंडळीनी साथ संगत दिली. परीक्षक म्हणून मुंबईतील प्रसिद्ध गायिका गौरी पंडित यांनी काम पाहिले. यामध्ये करमाळा तालुक्याचे सुपुत्र व सोलापूर येथील भुलतज्ञ डॉक्टर गोरख रोकडे यांनी दोन फेरीमध्ये पहिल्या फेरीत बेनाम या चित्रपटातील नरेंद्र चंचल यांनी गायलेले “मै बेनाम हो गया” आणि दुसऱ्या फेरीमध्ये मो, रफी यांनी गायलेले अमर अकबर अँथनी या चित्रपटातील कव्वाली “परदा है परदा “अशी दोन वेगवेगळ्या प्रकारची गीते सादर केली. त्यांच्या या बहारदार आवाजाने आयोजकांसह प्रेक्षकांनीही भरभरून दाद् दिली. त्यांच्या या बहारदार सादरीकरणामुळे त्यांना परीक्षकांनी द्वितीय क्रमांक जाहिर केला डॉ रोकडे यांना मिळालेल्या यशाबद्दल करमाळा येथील पार्श्वगायक व संगीतकार प्रवीणकुमार अवचर यांनी विशेष अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सामाजिक बांधिलकी जपत आपला डॉक्टर पेशा सांभाळत गाण्याचा छंद जोपासणारे डॉ. रोकडे यांचे तालुक्यातील सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. तसेच डॉक्टर रोकडे यांचे सोलापूर जिल्हा डॉक्टर असोसिएशनतर्फे विशेष अभिनंदन करण्यात आले.