सोलापूर : तिऱ्हे येथील डॉ. भैय्यासाहेब वळसंगकर प्रशालेत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. नवीन शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हापरिषद सदस्य बाळासाहेब सुरवसे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अजय सोनटक्के ( उपसरपंच), शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आनंद जाधव व बलभीम शिंदे उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले. तसेच इ. दहावीत प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ग्रामसेवक पप्पू काटकर(स्वामी) यांच्या आजी तानु बाई स्वामी यांच्या स्मरणार्थ बक्षिस देण्यात आले . प्रथम क्रमांक सृष्टी शिंदे -रुपये 5001/- द्वितीय क्रमांक समृद्धी साखरे 3001/- तृतीय क्रमांक प्रणाली सुरवसे 2001/-रुपये याप्रमाणे बक्षिसाची रक्कम देण्यात आली व प्रशालेतर्फे ट्रॉफी देण्यात आली.सर्व विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन शाळेत पहिल्याच दिवशी उत्साहात स्वागत केले.शालेय आवारात फुगे ,फुलांचे तोरण इत्यादींनी सुशोभन करण्यात आले होते
सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊ वाटप करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमंत बनसोडे यांनी केले तसेच उपस्थित सर्वांचे मुख्याध्यापक काशीद यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष, प्रमुख पाहुणे ,सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी तसेच बहुसंख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते. अत्यंत उत्साही तसेच आनंददायी वातावरणात प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न झाला.