महापालिकेत डझनावर शासकीय अधिकारी मात्र…!

0
280

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर महानगर पालिकेमध्ये वर्षानुवर्ष अधिकाऱ्यांची वानवा होती शिवाय महापालिकेत इतर ठिकाणचे अधिकारी यायला तयार नव्हते मात्र कोरोनाच्या कालावधीपासून शासन महापालिकेवर मेहेरबान झाले असून जवळपास डझनहून अधिक शासकीय अधिकारी महापालिकेत पाठविले आहेत मात्र यातील एक दोन अधिकारी सोडले तर सर्व अधिकारी गाड्यातून महापालिके देणे आणि महापालिकेतून घरी जाणे एवढाच उद्योग करतात त्यामुळे हे अधिकारी टक्केवारी खाण्यासाठीच महापालिकेत आलेत का अशी शंका निर्माण होते . सोलापूर शहरातील अतिक्रमणे काढणे ,सोलापूर शहरातील मालमत्ता कराची वसुली वाढविणे, बोगस नळांची मोहीम सुरू करून दंड वसूली करणे,  विविध उत्पन्न वाढविणाऱ्या आणि सोलापूर शहर खऱ्या अर्थाने स्मार्ट दिसणाऱ्या कामाकडे महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी अधिकाऱ्यांना कामाला लावावे तरच या अधिकाऱ्यांचा फायदा होईल नाहीतर एवढी खोगीरभरती कशाला असा प्रश्न निर्माण होत आहे