सोलापूर – आज डॉक्टर्स डे दिनानिमित्त मदर तेरेसा हॉस्पिटल येथे महापालिकेच्या डॉक्टरांचा सन्मान महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. यावेळी सहायक आरोग्य अधिकारी बोराडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी सोलापूर शहरात गेल्या दोन वर्षापासून कोरोणाचा प्रादुर्भाव मध्ये डॉक्टर्स अहोरात्र काम करत आहेत अशा डॉक्टरांचा आज सन्मान डॉक्टर्स डे निमित्त करण्यात आले.यावेळी महापौर यांनी सर्व डॉक्टरांना डॉक्टर डे च्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी तसेच अशोक चौक येथील डॉ.कनकी दाम्पत्य यांचे सुद्धा सन्मान या वेळी करण्यात आला. डॉ.मंजिरी कुलकर्णी,डॉ.बोरोडे,डॉ.सोडल,डॉ.मीनल चिडगुपकर, डॉ.चाफळकर, डॉ.तन्वंगी जोग,डॉ. स्वप्नाली नागणे,श्री शेटे ,कोळेक, श्री सोम, श्री बामणे,श्री श्रीशैल. सौ सुरेखा पुजारी,रेश्मा तलफ़दार,अंजली काकडे,श्री कोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.