सोलापूर ; सालाबादाप्रमाणे यंदाही अनुभव प्रतिष्ठान सोलापूर ट्रस्ट यांच्या वतीने दिवाळी सणानिमित्त एकात्मिक बालविकास अंगणवाडी शेळगी येथे गरजू अनाथ आणि बेघर विद्यार्थीसाठी मोतीचूर लाडू,शंकरपाळी,चिवडा,चकली,करंजी,मैसूरपाक इत्यादी पदार्थ फराळ म्हणून वाटप करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव मन्मथ वि.कोनापुरे, याच्या हस्ते भारत मातेचे प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी मन्मथ वि.कोनापुरे म्हणाले गरजू विद्यार्थ्यांना फराळ वाटप करण्यात येतो खरच प्रतिष्ठानचे कार्य उल्लेखनीय व स्तुत्य उपक्रम आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अंगणवाडी सेविका सुनिता कुलकर्णीअंगणवाडी मदतनीस सुवर्णा पवार, मल्लिनाथ हवीनाळ,सुनंदा भाईकट्टी,मंजुषा पवार,राजेंद्र कुलकर्णी, आनंद महाजन,आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश भाईकट्टी,चेतन बऱ्हाणपूरे शिवानंद नागणसुरे,शिवानंद भाईकट्टी,संतोष शिवशिंपी,मंगेश कुलकर्णी, ऋषीकेश कुलकर्णी,समर्थ शिवशिंपी,सचिन लोणी ,महेश कासट,सोमनाथ कालदीप,आदी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन गणेश येळमेली यांनी केले तर आभार प्रदर्शन गणेश कालदीप यांनी मानले