सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

0
21

सोलापूर : जिल्हा नियोजन समिती, कार्यकारी समितीची बैठक सोमवारी (दि.13 जून) सकाळी 11.30 घेण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांनी दिली.

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली 11.30वाजता वाजता जिल्हा नियोजन समितीची बैठक नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. बैठकीमध्ये मागील बैठकीच्या इतिवृत्ताला मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना 31 मार्च 2022 अखेरच्या खर्चाला मान्यता देणे, 2022-23 साठी योजनानिहाय व यंत्रणानिहाय अर्थसंकल्पित तरतुद याबाबत चर्चा होणार आहे.

बैठकीला खासदार, आमदार, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.