सोलापूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर सन 2022-23 मधील जिल्हा किशोरी खो-खो संघाचे प्रशिक्षण शिबीरा शासकीय मैदान नेहरुनगर विजापूर रोड येथे 27 जानेवारी ते 05 फेब्रुवारीपर्यत सकाळी 6.30 ते 8.30 यावेळेत आयोजित केले आहे.
या प्रशिक्षण शिबीरामध्ये खो-खो या खेळाचे क्रीडा प्रशिक्षण तज्ञ व अनुभवी क्रीडा मार्गदर्शक यांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. या प्रशिक्षण शिबीरामध्ये सहभागी होणा-या शहर व जिल्हयातील 14 वर्षाखालील मुली सहभागी होऊ शकतात. सदर प्रशिक्षण शिबीर विनामूल्य असून जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे. संपर्कासाठी नांव नोंदणीसाठी तालुका क्रीडा अधिकारी सत्येन जाधव (मो.नं.9028095500) अथवा पुंडलिक कलखांबकर (मो.नं.9850899572) यांच्याशी संपर्क साधावा.