सोलापूर : जय हनुमान मित्र मंडळाच्या वतीने राम जन्मभूमी आयोध्या येथे महाराष्ट्रातील कांबळे कुटुंबीयांना प्रभू रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठापना मूर्तीची पूजा करण्याचा योग आला. त्याच पद्धतीने जय हनुमान मित्र मंडळ, लिमयेवाडी या परिसरातील हनुमान मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेस जलाभिषेक, दुग्ध अभिषेक, महाआरती, पंचारती करण्यात आली. तसेच भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. विविध धार्मिक विधी मंडळाचे मार्गदर्शक बापूसाहेब कांबळे यांच्या हस्ते पार पडले. हा सोहळा यशस्वी होण्याकरिता मंडळाचे मार्गदर्शक विजय राऊत, राज शेखर जेऊरगी, अंबादास कांबळे प्रसाद थोरात, विठ्ठल गुरव , सुरज येजगर, सुमन जमदाडे,रवि खुणे, इत्यादींचे विशेष सहकार्य मिळाले.