सोलापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होते आहे. कोरोनाचा फैलाव रोखणे यासाठी आरोग्यसेवा तात्काळ उपलब्ध होणे अत्यावश्यक आहे. याच हेतूने, आधार युवा फाऊंडेशन याच्याकडून गोरगरिबांना व गरजू लोकांना सॅनिटायझर, मास्क व डेटॉल साबण वाटण्यात आले. यावेळी डोणगावचे संरपच संजय भोसले, शाखाध्यक्ष विनायक भोसले, शिवाजी भोसले व आधार युवा फाऊंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते.