सोलापूर : लोकराजा फाउंडेशनच्या वतीने दिवाळी निमित्त मुलांन साठी फराळ व फटाके देण्यात आले. दिवाळी सेलिब्रेशन म्हणून केक कापुन मुलांन सोबत फराळ केला मस्त गप्पा मारल्या त्यांची स्वप्ने ऐकली कोणी डाॅक्टर,इंजिनिअर,शिक्षक,होणार असे सांगितले पण जास्त मुलांनची स्वप्ने हि मी पोलीस होणार हीच होती. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी गुन्हेगारी जमात म्हणून ओळखल्या जाणार्या पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले त्यांच्याच कार्याची फलश्रृती म्हणावी की आज ह्या समाजातील लहान मुलांनाही आपण मुख्य प्रवाहात येण्याची इच्छा व जिद्द निर्माण होत आहे. त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचे काम लोकराजा फाउंडेशन नक्कीच करेल असे प्रतिपादन आशुतोष तोंडसे यांनी केले.
परमेश्वर काळे व त्यांच्या टिम ला माझ्या शुभेच्छा मी व लोकराजा फाउंडेशन आपल्या सेवे साठी सदैव्य तत्पर आहोत. यावेळी आशुतोष तोंडसे
रोहित लोंढे, सुशांत लोभे, सागर लोंढे, अजय बनसोडे यांची उपस्थिती होती. हा कार्यक्रमासाठी परीश्रम घेणाऱ्या माझ्या लोकराजा फाउंडेशनच्या टिमचे आभार.