सोलापूर – सोलापूर महानगर पालिकेच्या नगर रचना विभाग व मिळकत कर विभागाच्या वतीने अनाधिकृत बांधकाम अनधिकृत वापर बांधकामात बदल आणि कर आकारणी बद्दलचे सर्वेक्षण संयुक्त पणे मोहीम राबविण्यात येत असून त्या अनुषंगाने आज महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी रेल्वे लाईन सिद्धेश्वर पेठ शनिवार पेठ,तेलंगी पच्छा पेठ, बेगम पेठ अश्या विविध ठिकाणी आज पाहणी केली.यावेळी उपायुक्त आशिष लोकरे. नगर रचना संचालक मनिष भीष्णूकर,नीलकंठ मठपती,विभागीय अधिकारी हिदायत मुजवार युवराज गाडेकर संबंधित अधिकारी उपस्थिती होते. यावेळी आयुक्त यांनी बांधकाम परवानगी, मिळकत कर इतर माहिती जाणून घेतली. तसेच यावेळी उपस्थिती असलेल्या अधिकारी यांना बांधकाम परवानगी व मिळकत कर पाहणीच्या अनुषंगाने सूचना दिल्या.
