सोलापूर : धर्मराज काडादी यांच्या गंगा निवासस्थानी खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार दिलीप माने, सिद्धेश्वर परिवाराचे नेते धर्मराज काडादी, सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके, राजशेखर शिवदारे यांची बैठक झाली. या बैठकीनंतर माजी आमदार दिलीप माने यांनी भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून धर्मराज काडादी यांची उमेदवारी कायम असणार आहे. दिलीप माने हे अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.