सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार देवेंद्र राजेश कोठे यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करू, असा विश्वास भाजपाचे शहर उपाध्यक्ष आणि शहर उत्तर विधानसभा समन्वयक अनंत जाधव यांनी व्यक्त केला. देवेंद्र कोठे यांनी शुक्रवारी भाजपा शहर उपाध्यक्ष अनंत जाधव यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
यावेळी अनंत जाधव म्हणाले, भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या विजयासाठी सर्व शक्तीने सर्वजण प्रयत्न करू. माझी ताकद देवेंद्र कोठे यांच्या विक्रमी विजयासाठी पणाला लावेन, अशी ग्वाहीदेखील अनंत जाधव यांनी याप्रसंगी दिली. भाजपा आणि महायुतीचे कार्यकर्ते जोरदार संपर्क करीत असल्याने शहर मध्य मतदारसंघात भाजपाचा विजय पक्का आहे, असेही श्री. जाधव याप्रसंगी म्हणाले.
यावेळी भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे आणि शहर उपाध्यक्ष अनंत जाधव यांनी विधानसभा निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा केली.
देवेंद्र कोठे म्हणाले, भाजपाचे शहर उपाध्यक्ष अनंत जाधव यांचे पक्षासाठी मोठे योगदान आहे. त्यांनी कार्यकर्त्यांची मोठी फळी भारतीय जनता पार्टीत तयार केली आहे. त्यांच्या माध्यमातून विधानसभा निवडणूकीतील विजयाचा मार्ग सुकर होणार आहे.
यावेळी उद्योजक संजीव शरणार्थी, सचिन बुरांडे, नेताजी जाधव, आदर्श बंडगर, सोनू हुच्चे, महादेव स्वामी, सुनिल लवटे आदी पदाधिकारी तसेच भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.