आमदार देवेंद्र कोठे : प्रभाग क्रमांक १३ मध्ये रस्ते डांबरीकरणाचा शुभारंभ
सोलापूर : शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १३ साठी पहिल्या टप्प्यातील १ कोटी ८० लाख रुपये तसेच २५ -२६ च्या हेडमधून ४ कोटी ८८ लाख रुपये असा एकूण ६ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून यातील अनेक कामे पूर्ण झाली आहेत. तर उर्वरित विकासकामे लवकरच पूर्णत्वास येतील, असा विश्वास शहर मध्य मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांनी केले. प्रभाग १३ मधील ७० फूट रस्त्यानजीक रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ शुक्रवारी आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते झाला. यावेळी भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, प्रभाग क्रमांक १३ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. येथील नागरिकांनी प्रत्येक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला भरभरून मतदान केले आहे. त्याची परतफेड म्हणून प्रभाग क्रमांक १३ साठी सुमारे ७ कोटी रुपयांचा विकासनिधी देण्यात आला आहे.
आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, पूर्वीचे आमदार एकदा निवडून आले की अनेक महिन्यांनी जणू सुट्टीलाच

