सोलापूर : सोलापूरला विमानसेवा नाही म्हणून सतत हिनवले जात आहे .यामुळे शहरातील उद्योगांचे आणि नागरिकांचे स्थलांतर होत आहे. अशातच काही महत्त्वाचे निर्णय सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या बैठकीत घेण्यात आले. बऱ्याच वर्षापासून रखडलेल्या उजनी सोलापूर जलवाहिनीच्या ६३१ कोटी रुपयांचा ठेका कोल्हापूरच्या लक्ष्मी इंजिनिअरिंग या कंपनीला देण्यात आला आहे त्यामुळे येत्या 30 महिन्यात सोलापूरला मुबलक पाणी मिळेल अशी आशा करायला हरकत नाही. गुन्हेगारावर तसेच शहराच्या वाहतुकीवर वचक ठेवण्यासाठी 130 चौकामध्ये 5 कोटी रुपये खर्चून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. शहरातील पाणीपुरवठ्याचे तसेच शहराचे आणि इतर काही गोष्टीचे एकत्रीकरण करून कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारण्यात येत असून याला 100 कोटी रुपये गृह विभागाकडून मागण्यास स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. स्मार्ट सिटी कंपनीची कामे वेळेत न झाल्यामुळे जे पैसे बँकेत ठेवले आहेत त्यातून तब्बल 50 कोटी रुपये व्याज मिळाले आहे मात्र हे व्याज केंद्र सरकारला परत करावे लागणार आहे. सोलापूर महापालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांनी देखील शहरातील दोन उड्डाणपूलांचा मूल्यांकनाचा अहवाल दहा दिवसात जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणार असल्याची जाहीर केले आहे त्यामुळे माझं शहर नक्कीच भविष्यात बदलेल अशी आशा करुयात..!