राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान आपल्या भाषणात उल्लेख केलेल्या ‘लैंगिक छळ’ झालेल्या पीडितांचा उल्लेख केला होता.
दिल्ली पोलीस थेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान आपल्या भाषणात उल्लेख केलेल्या ‘लैंगिक छळ’ झालेल्या पीडितांचा उल्लेख केला होता. त्याची माहिती घेण्यासाठी त्यांना देण्यात आलेल्या नोटीसच्या संदर्भात दिल्ली पोलीस काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचली आहे. राहुल यांनी काश्मीरमधील आपल्या भाषणात बलात्कार झालेल्या काही महिलांचा उल्लेख केला होता. आम्ही त्यांना या महिलांचा तपशील मागवणारी नोटीस पाठवली होती आणि आता त्याबद्दल त्यांची चौकशी करू, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एका इंग्रजी दैनिकाशी नाव न सांगण्याच्या अटीवर बोलताना सांगितले.
जम्मू-काश्मीरमधील भारत जोडो यात्रेदरम्यानच्या भाषणात राहुल गांधी काय म्हणाले होते?
भारत जोडो यात्रेदरम्यान श्रीनगरमध्ये माध्यमांना संबोधित करताना गांधी म्हणाले होते की, “जेव्हा मी चालत होतो, तेव्हा खूप स्त्रिया रडत होत्या… त्यांच्यापैकी अनेक होत्या ज्यांनी मला सांगितले की, त्यांच्यावर बलात्कार झाला आहे, त्यांचा विनयभंग झाला आहे. काहींनी सांगितले की, त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा विनयभंग केला आहे. जेव्हा मी त्यांना विचारले की, मी पोलिसांना सांगायला हवे, त्यांनी मला नको असे सांगितले. त्या म्हणाल्या त्यांना मला माहिती द्यायची होती, परंतु त्यांनी दिलेली माहिती मी पोलिसांना सांगू नये, असं त्यांचं म्हणणं होतं. त्याल म्हणाल्या की, त्यांना आणखी समस्यांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे हेच आपल्या देशाचे वास्तव आहे.