सोलापूर, दि. ७ ऑगस्ट (जिमाका) : – सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभाह्याच्या दिनांक
3 जून 2025 च्या शासन निर्णयान्वये सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी वितरीत करावयाच्या पुरस्काराबाबत पात्र संस्थांची छाननी करुन, प्रस्ताव मान्यतेसाठी शासनास सादर करण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. त्यानुसार सहकार पुरस्कार संदर्भात सदर शासना निर्णयामध्ये सविस्तर सुचना देण्यात आलेल्या आहेत. या सुचनानुनसार सहकार पुरस्कारसाठी सहकारी संस्थांचे प्रस्ताव मागविणे, छाननी करणे, मुख्यालय सादर करणे, मुख्यालय स्तरावरील समितीने शिफारस पात्र संस्थांची यादी तयार करुन शासन स्तरावरील समितीस सादर करणे कळविण्यात आलेले आहे.
सहकार पुरस्कार सन २०२३-२४ च्या करीता संस्थाप्रकार निकष व गुणांकन यांची माहिती सहकार आयुक्तालयाच्या http://sahakarayukat.maharashtra.gov.in स्थळावरीलमुखपृष्ठावर ‘महत्तवपुर्ण कार्यक्रम ‘ या टॅबवर ‘पुरस्कार व कामगीरी येथे’ येथे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राजूय,पुणे यांनी सहकार पुरस्कार २०२३-२४ करीता संस्थांचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी दिनांक 18 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. आपल्या सहकारी सुतगिरणी/ सहकारी यंत्रमाग/ सहकारी हातमाग संस्थांनी आपले प्रस्ताव दिनांक १८/०८/२०२५ पुर्वी संबंधीत तालुका सहाय्यक निबंधक / उपनिबंधक सहकारी संस्था, यांचेकडे सादर करण्याची दक्षता घ्यावी. असे अवाहन आयुक्त, वस्त्रोद्योग,महाराष्ट्र राज्य,नागपूर यांनी केलेले आहे.