दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत प्रिसीजन वाचनदूत श्रीधर खेडगीकर यांच्या उपस्थिती मध्ये मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमउत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात 9 अ मधील विद्यार्थिनींच्या मराठी नाटकाने झाली.5 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तिपत्राचे उद्घाटन पाहुण्यांनी केले.


रिचिता नारायणकर हिने मराठी भाषेचे महत्त्व सांगितले.अथर्व बडगू याने श्रीधर खेडगीकर यांची मुलाखत घेतली. ‘विद्यार्थ्यांनी शालेय वयातच पुस्तकं, वर्तमान पत्र वाचा, शब्द संपत्ती वाढवा,मराठी भाषा जपा,विकसित करा ‘असा मोलाचा संदेश त्यांनी मुलांना दिला.
त्यानंतर 7 वी, 8 वी च्या विद्यार्थ्यांनी खणखणीत आवाजात पोवाडा सादर केला.विदयार्थ्यांनी आई,मराठी,आठवण, विचार, शिवराय अशा विषयांवर स्वरचित कविता सादर करून काव्य संमेलन भरवले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा जाधव आणि चंद्रिका जिंदे यांनी केले.तर विजया गोरसे हिने आभार मानले मुख्याध्यापिका मनिषा पाटील, पर्यवेक्षिका सुनीता गवळी, पुष्पा शहाणे, स्मिता हुमनाबादकर, पल्लवी पूरी, लक्ष्मण जगताप, रवी सुरवसे हे या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते.

