शनिवारी लक्ष्मीतरू गार्डन येथे होणार स्पर्धेचा एक्स्पो कार्यक्रम.
शारदा प्रतिष्ठान संचलित सायकल लवर्स सोलापूर यांच्याकडून रविवार दिनांक 28 जानेवारी रोजी CLS सोलापूर सायक्लोथोन 2024 च्या चौथ्या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सायकलोथोन स्पर्धेचा एक्सपो कार्यक्रम शनिवार दिनांक 27 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता शिवाजीनगर बाळे येथील लक्ष्मीतरु गार्डन येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती सायकल लवर्स सोलापूरचे डॉक्टर प्रवीण ननवरे यांनी दिली.
सायकल चालवणे हा फक्त व्यायामप्रकार असून पर्यावरण व आर्थिक दृष्या ही उपयुक्त आहे. त्यामुळे सायकलिंग बाबतचा अवेअरनेस वाढवण्यासाठी सायकल लवर्स सोलापूर यांचेकडून वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. दरवर्षी जानेवारी महिन्यात प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यवर सीएलएस सोलापूर सायक्लोथोन या मानांकित स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा स्पर्धेचे चौथे वर्ष असून सोलापूर शहर जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील सायकलिस्ट ही यामध्ये सहभागी झाले आहेत.
शिवाजीनगर बाळे येथील लक्ष्मीतरू गार्डन येथून स्पर्धेला सुरवात होऊन पुणे हायवे ते विजापूर बायपास या मार्गावर 25 आणि 50 किलोमीटर या दोन कॅटेगरीत ही स्पर्धा होणार आहे. टाईम मशीन च्या साहाय्याने स्पर्धकांमधील विजेत्यांची नावे काढली जाणार असून त्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरवण्यात येणार आहे.
याशिवाय शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी म्हणून गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलचे वाटप ही मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या स्पर्धेचा एक्स्पो कार्यक्रम शनिवारी सायंकाळी पाच वाजता स्पर्धेच्या ठिकाणी होणार असून यात मागील वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सायकलपटूंचा व सीएलएस विंटर चॅलेंज पूर्ण केलेले सायकलिस्ट याचा गौरव सोलापूर शहर उपायुक्त अजित बोऱ्हाडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सहभागी महिला सायकलिस्ट यांच्या सन्मानार्थ सीएलएस वुमन विंग यांचे यांचेकडून विशेष कार्यक्रमाचे आयोजन ही करण्यात आले आहे.
सोलापुर मध्ये सायकलिंग क्षेत्रात मानांकनानुसार पार पडणार ही एकमेव सायक्लोथोन स्पर्धा असून ती पाहण्यासाठी व सहभागी सायकलिस्ट स्पर्धक यांचा उत्साह वाढवण्यासाठी जास्तीत जास्त सायकल प्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन सीएलएसचे समन्वयक महेश बिराजदार, इंजी.अमेय केत, अविनाश देवडकर, प्रवीण जवळकर , महिला समन्वयक डॉ.रूपाली जोशी व डॉ. राजश्री वाघचवरे यांनी केले आहे .