येस न्युज मराठी नेटवर्क : जुनी मिल आवारातील संभाजीराव शिंदे विद्या मंदिरात देशाचा ७५ वा( अमृत महोत्सवी ) प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी सैनिक अरुण तळीखेडे, मिथुन ताकमोगे यांच्या हस्ते संस्थेचे उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक देवेंद्र दादा कोठे, चि. विष्णुराज देवेंद्र कोठे, मुख्याध्यापक नागेशकुमार काटकर, मुख्याध्यापिका राजश्री नारायणकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत झेंडावंदन करण्यात आले.
वंदे मातरमने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी बहारदार सांघिक कवायत व साहित्य कवायत केली. यावेळी विद्यार्थ्यांनी समूहगीत सादर केले. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनीआपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे अरुण तळीखेडे व मिथुन ताकमोगे विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त अंगी बाणून आई-वडील व गुरुजनांची आज्ञा पाळण्याचे आवाहन केले. यावेळी बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी जय हो या देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक नागेशकुमार काटकर यांनी केले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपीचंद राठोड यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका राजश्री नारायणकर यांनी केले.
यावेळी पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गोड खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते २६ जानेवारी रोजी वाढदिवस असलेल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.