मुंबई : महाराष्ट्रामध्ये तौक्ते चक्रीवादळाने मोठा कहर केलाय. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मुंबईमध्ये तर या वादळाचं रौद्र रुप पाहायला मिळालं. मुंबईतल्या समुद्र किनाऱ्याशेजारीच असणाऱ्या वानखेडे स्टेडियमला देखील वादळाचा फटका बसला. या वादळात स्टेडियमधील एक स्टँड कोसळलेलं पाहायला मिळालं तर एका साईट स्क्रीनचंही नुकसान झालं.

वानखेडे स्टेडियमला वादळाचा तडाखा
सोमवारी दिवसभर मुंबईत वादळी वारा सुरु होता. वाऱ्याचा आणि पावसाचा वेग असल्याने समुद्र किनाऱ्याशेजारील वानखेडे स्टेडियमला तौक्तेचा दणका बसला. स्टेडियमधील एका स्टँडचं वादळामुळे नुकसान झालं. स्टँड थेट जमिनीवर कोसळलं. तर बॅट्समनच्या एकाग्रतेसाठी महत्त्वाची असणारी साईट स्क्रिनही जमीनदोस्त झाली.