सोलापूरः नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रेडिएशन, नवी दिल्ली कडून पुनर्मानांकन प्राप्त झालेल्या विजापूर रोड वरील ए. जी. पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची Cummins India Pvt. Ltd., पुणे या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली.
Cummins India Pvt. Ltd., पुणे च्या अधिकाऱ्यांनी ए. जी. पाटील पॉलिटेक्निकच्या तृतीय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागातील 39 विद्यार्थ्यांची निवड केली.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शांती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एस. ए. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष मा. एस. एस. पाटील, संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. चौगुले व महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. एस. के. मोहिते यांनी अभिनंदन केले.
महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक एम. एम. कुलकर्णी व शैक्षणिक समन्वयक सौ. एस. एन. गवंडी आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख आर. एस. मोटगी व विभागीय प्लेसमेंट समन्वयक प्राध्यापक ए. आर. मळेकर यांनी सदर प्लेसमेंट ड्राईव्ह यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
तसेच विभागीय प्लेसमेंट समन्वयक प्राध्यापक पी. एस. दारा सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग, प्राध्यापिका जै. सी. सचदेव कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग, प्राध्यापिका एल. एस. केंदुले इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग व प्राध्यापक के. डी. साळुंखे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग यांचेही सदर कार्यक्रमास सहकार्य लाभले.