सोलापूर : (समाधान रोकडे) पावसाळा सुरू होऊन एक महिना पूर्ण होऊन देखील पावसाने सोलापूर तसेच इतर तालुक्यात हजेरी न लावल्यामुळे शेतकरी तसेच शेतामध्ये काम करणारे मजूर यांच्यावर संकट आल्याचे चित्र समोर येत आहे . दोन वर्षापासून कोरणाचे संकट व आता पाऊस येत नसल्यामुळे शेतकऱ्याने शेतामध्ये मशागत करून ठेवलेले असतानादेखील पाऊस न आल्यामुळे खरीप पेरण्या रखडल्या आहेत तर काही भागात ते पेरण्या होऊन देखील पावसाअभावी पिके सुखावली जात आहेत.पावसाळा सुरू होऊन एक महिना पूर्ण झाला असताना पावसाने हजेरी न लावल्यामुळे शेतकऱ्यांना पाऊस येतो का नाही आपले पिके येतात का नाही असा प्रश्न पडत आहे.शेतामध्ये लाखो रुपये खर्च करून देखील हरभरे खाल्ले हात कोरडे अशी परिस्थिती शेतकरी राजाची होत आहे.दोन वर्षे कोरोना या रोगामुळे पिके असताना म्हणावा असा भाव मिळाला नाही आता कोरोनाच संकट दूर होते तो पर्यंत निसर्ग शेतकऱ्यावर नाराज झाला की असे वाटत आहे.शेतकऱ्यावबरोबरच आता शेरीवर अवलंबून असणाऱ्या मजुरांवर देखील उपासमारीची वेळ येत आहे.कारण पाऊस झाला तर शेतात कामे उपलब्ध होत असतात पाऊसच नाही तर शेतकरी कसा कामाला लावेल यामुळे ग्रामीण भागातील अनेक महिला व पुरुष मजदूर यांच्यावर खूप मोठे संकट ओढले आहे.